North India Earthquake : दिल्लीसह ५ राज्यात भूकंपाचे धक्के

एमपीसी न्यूज : पंजाब, दिल्ली, एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआर, पंजाब, उत्तराखंडमध्ये जाणवले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील फायजाबाद येथून ३०० किमी उत्तर पूर्व येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घरातून बाहेर पळ काढला. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, घरातील सिलिंग फॅन्सही हलताना दिसून आले.

अमृतसरमध्ये भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी नागरिकांनी घरातून पळ काढला. भूकंपामुळे जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीये.

कुठे-कुठे जाणवले भूकंपाचे धक्के

भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये जम्मू, श्रीनगर, अमृतसर, दिल्ली, एनसीआर, लखनऊ, जयपूर, देहरादून, शिमला, जोधपूर येथे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.