Earthquake: भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी दिल्ली हादरली

एमपीसी न्यूज – दिल्ली, नोएडा आणि गुरुग्राममध्ये आज भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. आज (मंगळवारी) रात्री 10.17 च्या सुमारास दिल्ली-एनसीआरमधील लोकांना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. काही मिनिटे चाललेल्या या भूकंपाचे धक्के जम्मू-काश्मीरमध्येही जाणवले.

रिक्टर स्केलवर भूकंपाची (Earthquake) तीव्रता 7.7 एवढी होती, असा अंदाज मांडण्यात येत आहे. तुर्कमेनिस्तान, भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तान या देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

 

रावळपिंडीतील एएफपीच्या प्रतिनिधीने सांगितले की, “लोक घराबाहेर पळत होते आणि कुराणाचे पठण करत होते,” राजधानी इस्लामाबाद, लाहोर आणि पाकिस्तानमधील इतर ठिकाणांहूनही अशीच माहिती उपलब्ध होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.