Pimpri : भूगोल फाउंडेशनतर्फे भंडारा, भामचंद्र व घोरवडेश्वर डोंगर येथे स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांनी ज्या ठिकाणी तपश्चर्या करून आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानाचा विचार आपल्या अभंगवणीतून अवघ्या विश्वाला दिला. हा विचार त्या त्या ठिकाणी स्फुरला आणि साक्षात पाडुरंगाने त्यांना या तिन्ही ठिकाणी दर्शन दिले. अशा या तिन्ही पवित्र तीर्थ स्थानांना भेट देऊन या ठिकाणी भूगोल फाऊंडेशनद्वारे प्लास्टिकमुक्त स्वच्छता अभियान, पर्यावरण विषयी पत्रके वाटून जनजागृती आणि प्रबोधन करण्यात आले.

यावेळी भामचंद्र डोंगरावर देहू संस्थांनचे विश्वस्त हभप माणिक मोरे महाराजांनी व त्यांच्या सहकारी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करून सहकार्य करण्याचे सांगितले. भंडारा डोंगरावर गाथा मंदिरास भेट देऊन तेथे सुद्धा भाविकांना भेटून पत्रके वाटून समाज प्रबोधन केले. या ठिकाणी भंडारा समितीचे सचिव नाटक जगन्नाथ पाटील व ह भ प केशवमहाराज मोरे यांच्या हस्ते पिंपळ वृक्षारोपण करण्यात आले. तसेच तेथील गोशाळेला भेट देण्यात आली.

भंडारा डोंगराच्या पायथ्याला कमानी जवळ तिन्ही डोंगरांचे महात्म्य आणि पावित्र्य राखून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन येणा-या भाविक व नागरिकांना कायम स्वरूपी फलक लावून प्रबोधन करण्यात आले. यावेळी पांडुरंग वाडेकर व कांताबाई वाडेकर उपस्थित होते. घोरावडेश्वर डोंगरावर सुद्धा स्वच्छता अभियान राबून सगळीकडे एकूण २१ पोती प्लास्टिक गोळा करण्यात आले. झाडे लावा, झाडे जगवा, पाण्याचा दुरुपयोग टाळा, प्लास्टिकचा वापर करु नका, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास हातभार लावा. अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले.

या मोहिमेत भूगोल फाउंडेशनचे ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल नाना वाळुंज यांनी भामचंद्र व भंडारा डोंगरावर सर्व भाविक भक्तांना करत असलेल्या पर्यावरण कामाची माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये साहेबराव गावडे, बाळासाहेब गरुड, कर्नल तानाजी अरबुज, निकुंज रेंगे, गणेश चै्ाधरी, सुनील काटकर, अशोक वाडेकर, राजेश मोहंतो, विशाल शेवाळे, अतुल नढे, स्वराज नढे व इतर अनेक सहकारी यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.