Ecobricks Activity : सांगवडे ग्रामपंचायत व रोटरी क्लबचा इकोब्रिक्स उपक्रम; गावातील प्लॅस्टिकचा राक्षस बाटलीबंद होणार

एमपीसी न्यूज – (श्याम मालपोटे) – प्लास्टिक कचऱ्याची (Ecobricks Activity) समस्या पाहता आपले गाव आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिकचे वर्गीकरण आणि पुनःप्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्याकरिता ‘इकोब्रिक्स’ हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. हे लक्षात घेऊन 5 ऑगस्ट रोजी सांगवडे येथे ‘एकोब्रिक्स मार्गदर्शन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान, सांगावडे गाव कचरा व्यवस्थापन व इकोब्रिक्स ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन सांगवडे ग्रामपंचायत व रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेच्या शाळा सांगवडे येथे आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यशाळेत ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला व ग्रा.पं सदस्य यांना कचऱ्याची समस्या, कचऱ्याचे वर्गीकरण, सर्वाना भेडसावणारी प्लास्टिक समस्या, इकोब्रिक्स म्हणजे काय? इकोब्रिक्स कशी बनवावी? इकोब्रिक्सचा वापर काय होऊ शकतो? इकोब्रिक्स बनवण्याचे फायदे, इकॉब्रिक्स पासून विविध कलाकृती बनवणे, इकोब्रिक्सचे तोटे व प्लास्टिक वापर कमी करण्याविषयी विविध उपाय याविषयी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या रोटरीयन रेश्मा गणेश बोरा यांनी मार्गदर्शन केले. तसेच, शाळेतील मुलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी इकॉब्रिक्स बनवा स्पर्धेचे आयोजन करण्याची माहिती रोटरीयन स्वाती प्रदीप वाल्हेकर यांनी मुलांना आणि शिक्षकांना दिली. स्पर्धेत सहभागी मुलांना प्रमाणपत्र आणि बक्षीस देऊन गौरविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

Ecobricks Activity

Ajit Pawar : मुख्यमंत्री फिरताना रात्री उशिराही स्पीकर चालूच असतो!

रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रोटरीयन गणेश बोरा ह्यांनी ग्रामस्थांना येणाऱ्या काळात भीषण होणाऱ्या कचरा समस्येवर आजच कचरा व्यवस्थापन सुरू करून आदर्श निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. तसेच, विद्यमान सरपंच रोहन जगताप यांनी गावातील मूलभूत समस्येविषयी (Ecobricks Activity) लोकजागृती करू व लोकसहभागातून उपक्रम यशस्वी करणार असल्याचे देखील सांगितले.

यावेळी गावचे सरपंच रोहन जगताप, उपसरपंच योगेश राक्षे, सदस्य राजश्री राक्षे, ललिता लिम्हण, काजल राक्षे, माया राक्षे, नंदा राक्षे, ग्रामसेवक रोहिणी खामकर, मंजू भंडारी, सुनीता मोकाशी मॅडम, अमोल मोकाशी, पोलीस पाटील तुषार मोकाशी, शाळा व्यस्थापन अध्यक्ष युवराज राक्षे, प्रिया राक्षे, सुषमा पानमंद, गणपत राक्षे, पोपट राक्षे, वसंत राक्षे, आनंदा आमले, अजिंक्य राक्षे, शिक्षक श्रीधर उतेकर,आण्णासाहेब ओहोळ, देवीप्रसाद तावरे, उर्मिला शिरसाट तसेच सर्वग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्यध्यापक संदीप सकपाळ यांनी सहकार्य केले. सरपंच रोहन जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.