Lonavala : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध

एमपीसी न्यूज – शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रियमंत्री शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले.

लोणावळा शहर राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याचे तसेच बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन करण्याचे ठरविले होते. मात्र, निवडणूक आयोगाने याकरिता परवानगी नाकारल्याने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते शिवाजी महाराज चौकात जमत त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निषेधाचे निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, दत्तात्रय गवळी, प्रदेश सचिव नारायण आंबेकर, किरण गायकवाड, नारायण पाळेकर, साहेबराव टकले, कुमार धायगुडे, वसंत भांगरे, रवी पोटफोडे, सोमनाथ गायकवाड, भुषण पाळेकर, अमोल गायकवाड, जितेंद्र कल्याणजी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.