ED Detain Sanjay Raut : संजय राऊत ईडीच्या ताब्यात, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई

एमपीसी न्यूज: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार असून तिथे अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. (ED Detain Sanjay Raut) आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता. संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली आहे. मुंबई पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. 

 

खासदार संजय राऊत यांची गेल्या 9 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. (ED Detain Sanjay Raut) याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. या दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.

 

Pavana Dam : पवना धरण परिसरात पावसाची गेल्या तीन दिवसापासून विश्रांती

 

संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले असून घोषणाबाजी सुरू आहे. संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसेना महिला कार्यकर्तांनी ठिय्या मांडला आहे. शिवसैनिकांना अटकाव करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. राऊत यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मागील दरवाजा जवळ पोलीस बंदोबस्त तैनात आहे. (ED Detain Sanjay Raut)राऊतांना मागील दरवाज्यातून नेण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील 9 तासांपासून खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये ईडीचं सर्च ऑपरेशन सुरुच आहे. दादरमधील गार्डन कोर्ट इमारत परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आली आहे. या इमारतीखाली सीआरपीएफ जवान आहेत. ईडीने आज संजय राऊत यांच्याशी संबंधित ठिकाणी छापा मारला आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.