ED : ईडीच्या रडारवर गेमिंग व्यवसाय; महाराष्ट्रासह इतर राज्यात कारवाई

एमपीसी न्यूज : भारतात कार्यरत असलेल्या परदेशी नोंदणीकृत ऑनलाइन गेमिंग कंपन्यांवर कारवाई केली. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट (FEMA), 1999 अंतर्गत या कंपन्यांचा तपास घेतला. 22 मे 2023 आणि 23 मे 2023 रोजी या अंतर्गत छापे टाकण्यात आले. 

दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे असलेल्या 25 परिसरांमध्ये ही कारवाई केली. छाप्यांदरम्यान, ईडीने ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मच्या ऑपरेशन्सवर प्रकाश टाकणाऱ्या कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह अनेक दोषी पुराव्यांचा पर्दाफाश केला.

याव्यतिरिक्त, एकूण 19.55 लाख रुपये जप्त करून या कंपन्यांशी संबंधित 55 बँक खाती देखील गोठवली.

Amit Shah : नव्या भारतीय संसदेमध्ये चोल राजांचा राजदंड (सेंगोल) स्थापन होणार

अवैध गेमिंग व्यवसायावर बंदी आणण्यासाठी ईडीने पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.