Rhea Chakraborty Interrogated By ED: रियाच्या बेहिशोबी संपत्तीची ईडीकडून सखोल चौकशी

ED investigates Rhea's disproportionate assets 2017-18 मध्ये रियाची कमाई 18.85 लाख रुपये होती. तरीदेखील तिने 34 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ते कसे केले? याचा शोध घेण्याचा प्रयत्न ईडी करीत आहे.

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या हत्येचे प्रकरण आता वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची आता सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) वतीने चौकशी सुरु आहे. त्यात तिच्या संपत्तीचे स्त्रोत, त्याचे डिटेल्स यांची तपासणी होत आहे. यात अनेक बाबी समोर आल्या आहेत. रियाचे उत्पन्न कमी असताना गुंतवणूक अधिक कशी, याचा तपास ईडी करत आहे.

मनी लाँडरिंगचा आरोप असलेल्या रिया चक्रवर्तीच्या इन्कमटॅक्स रिटर्न्सच्या तपशीलातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानुसार 2017-18 मध्ये रियाने आपली कमाई 18.85 लाख रुपये दाखविली. तर 2018-19 मध्ये 18.35 लाख रुपये कमाईचा उल्लेख आहे. असे असूनही या दोन्ही वर्षांत तिने केलेली गुंतवणूक ही कमाईपेक्षा अधिक आहे. ईडी रियाच्या या अतिरिक्त कमाईचे स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.

या चौकशीत समोर आलेल्या गोष्टींनुसार रियाच्या गुंतवणुकीत आणि मालमत्तेत अचानक वाढ झाली असून ती संशयास्पद असू शकते. 2018-19 मध्ये रियाची स्थिर मालमत्ता 96 हजार रुपयांवरुन 9 लाख रुपयांवर पोहोचली.

2017-18 मध्ये रियाची कमाई 18.85 लाख रुपये होती. तरीदेखील तिने 34 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. ते कसे केले? याचा शोध घेण्याचा प्रयत्न ईडी करीत आहे. त्यानंतर रियाचा शेअर होल्डर फंड 2018-19 मध्ये 34 लाखांवरुन 42 लाखांवर पोहोचला.

दोन वर्षांत रियाने 76 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तसेच रियाच्या एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत असलेल्या ठेवींचीही ईडी चौकशी करीत आहे.

रिटर्न्समधून धक्कादायक खुलासा झाला आहे. तो म्हणजे रियाने 2017-18 मध्ये मालमत्ता विकून 45 लाखांची कमाई केली. तर 2018-19 मध्ये तिने 58 लाख रुपयांची मालमत्ता विकली होती.

रियाने दोन वर्षांत एकूण एक कोटी तीन लाख रुपयांची मालमत्ता विकली होती. परंतु, दोन वर्षांत तिने केवळ 37.2 लाख रुपये कमावले असताना एवढी मालमत्ता कशी जमवली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ईडीने रियाकडे प्रॉपर्टीची कागदपत्रे मागितली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.