ED summons Rhea Chakraborty : रिया चक्रवर्तीला ‘ईडी’चा समन्स, शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या चौकशी प्रकरणी वेगाने घडामोडी घडत आहेत. दुपारी केंद्र सरकारने बिहार सरकारची सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी मान्य केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने रिया चक्रवर्तीला समन्स बजावला आहे.

सुशांत सिंगची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला सात ऑगस्टला अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासंबधी समन्स बजावला आहे. ईडीने रिया चक्रवर्ती हिला मुंबईतील तिच्या जुन्या पत्त्यावर आणि ईमेलद्वारे समन्स पाठविले आहे.

अंमलबजावणी संचालनालयातर्फे रिया चक्रवर्ती हिची तीन टप्प्यांत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत रियाचे सुशांतसिंग राजपूत यांच्याशी वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांबद्दल सखोल चौकशी केली जाईल अशी माहिती समोर येत आहे.

एनडीटीव्ही या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, रियाची तीन टप्प्यात चौकशी केली जाईल. पहिल्या टप्प्यात वैयक्तिक माहिती विचारली जाईल. तर, दुसर्‍या टप्प्यात व्यवसायाची माहिती मागविली जाईल. पॅनकार्ड तपशील, कंपनीचा टिन नंबर, कंपनीचा डीआयएन क्रमांक, उत्पन्नाचे स्रोत काय आहे, आयकर विवरणपत्र भरण्याविषयी माहिती इ.

तिसऱ्या टप्प्यात, केसशी संबंधित माहिती विचारली जाईल. सुशांत सिंगच्या संपर्कात तिचा कुठं आणि कसा संबंध आला, सुशांत सिंगसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये ती राहत होती का, वैगेरे प्रश्न तिला विचारले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यामुळे याप्रकरणी निष्पक्ष तपास होईल व कोणतीही माहिती लपून राहणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.