Bhosari : भोसरीत मंगळवारी शिक्षण परिषद 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने उद्या (मंगळवारी) महापालिका स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता होणा-या परिषदेचे उद्‌घाटन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर राहुल जाधव उपस्थित असणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

शिक्षण परिषदेत विविध शाळांतील गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे व गुणवत्ता वाढीसाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी बारा वाजता अमोल जोग यांचे शिक्षकांपुढील आव्हाने व त्याची बलस्थाने या विषयावर व्याख्यान होणार आहे. पावणे एक वाजता आसिफ शेख यांचे शाळासिद्धी व डिजीटल शाळा, तर दुपारी दीड वाजता दामिनी मयंकर यांचे गुणवत्ता पूर्ण शिक्षण व मंडल स्कूल या विषयावर व्याख्यान होणार आहे. भगवान साळुंके यांचे मातृभाषा शिक्षण प्रणी, आव्हाने, समस्या व उपाय या विषयावर अडीच वाजता व्याख्यान होणार आहे.

दुपारी तीन वाजता राजेश चव्हाण यांचे व्यक्तिमत्व विकास तर डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांचे ज्ञानरचनावाद या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता व प्रगत शाळांचे सादरीकरण होणार आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.