Education News : दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शंकाचे होणार युट्यूबमार्फत निरसन

एमपीसी न्यूज : राज्य सरकार आता दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना असलेल्या शंकांचे युट्यूब लाईव्ह सेशनमार्फत निरसन करणार आहे. या लाईव्ह सेशनची आजपासून सुरुवात होत असून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन आणि त्यांना शैक्षणिक मार्गदर्शनही यावेळी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून हे लाईव्ह सेशन घेण्यात येणार आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

12 वीच्या केमिस्ट्री विद्यार्थ्यांसाठी आज दुपारी 4 वाजता हे लाईव्ह सेशन होणार आहे. या वेळी युट्यूबच्या स्क्रीनवर एक ईमेल आयडी व संपर्कासाठी एक क्रमांक देण्यात येईल. विद्यार्थी या माध्यमातून त्यांना असलेल्या शंका विचारू शकतात. http://maa.ac.in/  या संकेतस्थळावर प्रत्येक विषयांचे युट्यूब सेशन कधी होणार आहे, याचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या लाईव्ह सेशनमध्ये https://www.youtube.com/embed/1OdDVaED-dQ या लिंकचा वापर करून विद्यार्थी जॉईन होऊ शकतात. राज्यातील विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहनही राज्य शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.