Talegaon Dabhade: कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत

जैन इंग्लिश स्कूलच्या शालेय समिती चा निर्णय

एमपीसी न्यूज – जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाचा कोरोना संकटाच्या काळात कोरोनाने मृत्यू झाला असल्यास शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या त्या पाल्याला इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे. जैन इंग्लिश स्कूलच्या शालेय समितीने तसा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश ओसवाल यांनी दिली.

तळेगाव आणि परिसरामध्ये  कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त असून यामध्ये अनेक नागरिकांना मृत्यूला सामोरे जावं लागलेले आहे. तसेच कोरोना संक्रमणामध्ये संक्रमित पालकांना व त्याच्या नातेवाईकांना रुग्णाला बरे करण्यासाठी मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावे लागले आहे. या सर्व बाबीचा विचार करून जैन इंग्लिश स्कूल मधील शालेय  समितीने ज्या विद्यार्थ्यांचे पालक या कोरोना महामारी मध्ये मृत्यू पावलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचे पूर्ण इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच सर 2020 -21 या चालू आर्थिक वर्षामध्ये जैन इंग्लिश स्कूल मधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फीमधून 25 टक्के सूट दिल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश ओसवाल यांनी दिले

तळेगाव आणि परिसरामध्ये अनेक इंग्लिश माध्यमाच्या शाळा कार्यरत आहेत. त्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकाला कोरोना संक्रमणामुळे मृत्यू आला तर जैन इंग्लिश स्कूलने स्वीकारलेल्या धोरणा प्रमाणे सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून निर्णय घ्यावा असे सुज्ञ नागरिकांचे मत असून विविध संघटनांकडून तसे आवाहनही करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.