Lonavala : सिंहगड महाविद्यालयात पुणे विद्यापीठाची शैक्षणिक परिषद कार्यशाळा 

एमपीसी न्यूज – सिंहगड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची दोन दिवसीय शैक्षणिक परिषद कार्यशाळा संपन्न झाली. प्रभारी कुलगुरु एन.एस.उमराणी यांच्या हस्ते या कार्यशाळाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी रामामंद तीर्थ विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरु डाॅ. पंडित विद्यासागर यांनी श्रेणी पद्धती या विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी शैक्षणिक परिषद परिषदेचे सदस्य डॉ.संजय चाकणे, प्रसेनजित फडणवीस, राजेश पांडे, डॉ.अरविंद शाळीग्राम, डॉ.उगले डॉ. नितीन घोरपडे, डॉ. मेघा उपलाने, डॉ. सुधाकर जाधवर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, नियोजन व विकास मंडळाचे रासवे, संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड व शैक्षणिक परिषदेचे मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य संघटनेचे प्रमुख नंदकुमार निकम यांनी महाविद्यालयाची स्वायत्ता या विषयावर मार्गदर्शन केले तर माजी प्रभारी कुलगुरु डाॅ. अरुण अडसूळ म्हणाले स्वायत्ता ही संस्था चालक विद्यार्थी पालक या सर्वांनी समजावून घेऊन प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. कार्यशाळेचा समारोप पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like