Pune : भारती विद्यापीठ ‘आयएमईडी ‘ आणि पोलंडमधील विद्यापीठात शैक्षणिक आदान -प्रदान

एमपीसी न्यूज- भारती अभिमत विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (‘आयएमईडी’) आणि पोलंडमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस इन रॉकलॉव् ‘ या विद्यापीठात शैक्षणिक आदान -प्रदान होणार असल्याची माहिती ‘युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस इन रॉकलॉव् ‘च्या प्रतिनिधी डॉ अनेटा सिझिमनसॉफ आणि भारती अभिमत विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि ‘आय एम ई डी’चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी दिली.

यासंबंधी 27 जुलै रोजी ‘आय एम ई डी’,पौड रस्ता कॅम्पस मध्ये बैठक झाली . डॉ सचिन वेर्णेकर म्हणाले, “विद्यार्थ्यांना जागतिक व असामान्य अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळावा या ध्यासाने दोन्ही संस्था तंत्रज्ञानाच्या साहाय्याने काम करतील.संस्थाना ज्ञान अदान-प्रदान करता येणार आहे” डॉ.एनेटा म्हणाल्या, “स्पर्धेच्या युगात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अनुभवाला अधिक महत्त्व आहे. तो विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्‍न दोन्ही संस्था करतील”

आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनशास्त्र सल्लागार प्रा. जयंत ओक ,’आयएमईडी’च्या प्लेसमेंट विभागाचे प्रा. दीपक नवलगुंद हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.