Educational News : EWS, NCL, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – तंत्रशिक्षणांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी EWS मूळ प्रमाणपत्र, NCL मूळ प्रमाणपत्र, मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र (CVC) सादर करण्यासाठी 20 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांनी या प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती ऑनलाईन अर्ज करताना सादर केली आहे, त्यांनाच ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व उमेदवारांनी 20 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने मूळ प्रमाणपत्र सादर करावीत. जे उमेदवार 20 जानेवारी पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रमाणापत्र सादर करणार नाहीत, अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द केला जाणार आहे.

तसेच या उमेदवारांना दुसऱ्या फेरी करीता खुल्या वर्गातून पात्र ठरविण्यात येईल असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

पुढील सुधारीत वेळापत्रक 18 जानेवारीनंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर (www.mahacet.org) प्रसिद्ध केले जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.