Chakan : भरधाव आयशर टेम्पोची चार वाहनांना धडक; तीनजण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या एका आयशर टेम्पोने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चार वाहनांना जोरात धडक दिली. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर तीनजण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी सहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडला.

_MPC_DIR_MPU_II

आयशर टेम्पो (एम एच 04 / डी एस 1766) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश मुरलीधर चौधरी (वय 38, रा. मोशी), राकेश सोपान गाडेकर, उमेश जगन्नाथ महाजन अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गिरीश चौधरी यांनी याबाबत शनिवारी (दि. 31) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयशर टेम्पो चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो भरधाव वेगात चालवून कुरुळी येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या चार वाहनांना जोरात धडक दिली. यामध्ये तीन दुचाकी आणि एक कार यांच्या समावेश आहे. चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर फिर्यादी चौधरी उजव्या  पायाचे नडगीचे हाड, गाडेकर यांच्या उजव्या पायाचे नडगीचे हाड मोडले आहे. तर महाजन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.