रमजान ईदः राजकीय व्यक्ती, सेलिब्रेटी, खेळाडूंनी दिल्या शुभेच्छा

Eid Mubarak political entity celebrity and sports person Gives Greetings Of Eid Ul Fitr

एमपीसी न्यूजः देशासह संपूर्ण जगभरात रमजान ईद साजरी केली जात आहे. यंदा कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या सावटाखाली रमजान ईद साजरी केली जात आहे. या सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना देशातील राजकीय व्यक्ती, सेलिब्रेटी, खेळाडू आदींनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आदींसह अनेकांनी टि्वटरवर ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याग व समर्पणाची शिकवण देणाऱ्या या सणानिमित्त शुभेच्छा देतानाच हा सण घरातच साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ईदच्या शुभेच्या देताना अल्लाने कोरोना विषाणूपासून जगभरातील लोकांचा बचाव करण्याची प्रार्थना केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना घरातच ईदची नमाज अदा करण्याचे आवाहन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने घरी सुरक्षित राहा, असे सांगत ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.