सोमवार, डिसेंबर 5, 2022

Hinjwadi Crime News: शिवीगाळ का केली? असे विचारणाऱ्या सूनेस चूलत सासर्‍यासह आठ जणांकडून लाथाबुक्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळ का केली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या चुलत सुनेस चूलत सासर्‍यासह आठ लोकांनी मिळून तिला व तिच्या सासर्‍यास लाथाबुक्यांनी मारहाण केली. घरात कोंडून ठेवले. फिर्यादीस लघवी पाजण्याचा घृणास्पद प्रयत्न देखील केला. हा प्रकार मुळशी मधील सुसगाव येथे रविवार 15 मे रोजी साडेबाराच्या सुमारास घडला.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलिसांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी भिमला जाधव, पिराजी जाधव, कपिल जाधव, अपिल जाधव (रा. पारखेवस्ती, सुसगाव) यांच्यासह 4 महिला अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व तिचे सासरे हे 15 मे रोजी आरोपी शिवाजी जाधव यांच्याकडे गेले. तुम्ही आम्हाला शिवीगाळ का केली असा जाब विचारला. त्यावरून चिडलेल्या आरोपी शिवाजी याने फिर्यादिस लाथाने मारहाण केली. आरोपी पिराजी याने चप्पलने मारहाण केली. आरोपी कपिल याने फिर्यादिच्या डोक्यात काठी मारली. तर, आरोपी अपिल याने बाटलीमध्ये स्वतःची लघवी गोळा करून फिर्यादीस पाजण्याचा घृणास्पद प्रयत्न केला गेला. महिला आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. त्याचबरोबर फिर्याद, फिर्यादीच्या सासर्‍यास घरात डांबून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींवर हिंजवडी पोलिस ठाण्यात विनयभंग, गर्दी मारामारीचा गुन्हा शनिवार (दि. 21) रोजी दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक नाहीत. पुढील तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

Latest news
Related news