Chikhali : टेस्टट्यूब बेबीसाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेला मूल होत नसल्याने टेस्टट्यूब बेबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. तसेच मूल होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. अशी फिर्याद एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पती धर्मेश वाघमारे, सासू कविता वाघमारे, सासरे विष्णू वाघमारे, दीर भीमेश वाघमारे, नणंद वर्षा रुपेश कामले, नंदावा रुपेश कामले, भागाबाई मानकर, कृष्णाबाई शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला मूल होत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी तिला अपमानास्पद वागणूक दिली. शिविगाळ करत मारहाण करून जेवण न देता तिचा छळ केला. लग्नात केलेल्या मागणीप्रमाणे सोने दिले नाही. यावरुन देखील शिविगाळ केली. मूल होत नसल्याने टेस्ट ट्यूब बेबीसाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्या पैशांसाठी वारंवार तगादा लावून विवाहितेचा छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी भागाबाई आणि कृष्णाबाई या दोघींनी मिळून फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या पतीचे दुसरे लग्न लावल्यानेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.