Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर परिसरातून आठ वाहने चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. घरासमोर, रस्त्यावर, सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहने चोरीला जात आहेत. निगडी, चाकण, दिघी, पिंपरी, चिखली आणि चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आठ वाहने चोरीला गेली आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 26 मे) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

जगतापवाडा निगडी गावठाणमधून 25 हजारांची पल्सर दुचाकी चोरीला गेली आहे. रतन जयवंत जगताप (वय 51, रा. जगतापवाडा निगडी गावठाण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अमोल गजानन खाचने (वय 41, रा. येलवाडी, ता. हवेली) यांची 10 हजारांची स्प्लेंडर दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली. दत्ता संभाजी गावडे (26, रा. धामणे, ता. खेड) यांची 40 हजारांची पल्सर दुचाकी महिंद्रा लॉजीस्टिक कंपनी सावरदरी येथून चोरीला गेली आहे. दोन्ही प्रकरणात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

धनाजी वामन कांबळे (वय 35, रा. मुंढवा पुणे) यांची 50 हजारांची युनिकॉर्न दुचाकी इंद्रायणी घाट आळंदी येथून चोरीला गेली. कांबळे यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कांबळे यांच्याकडे चालक म्हणून काम करणारा केशव तुकाराम भोसले (वय 28, रा. मुंढवा पुणे) याने ही दुचाकी चोरून नेली आहे.

राहुल कमलाकर जाधव (वय 29, रा. आकुर्डी) यांची 20 हजारांची मोपेड दुचाकी एच ए मैदानाच्या फूटपाथवरून चोरीला गेली आहे. याबाबत जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Chinchwad) फिर्याद दिली आहे.

Sangvi : कामावर नसलेल्या कर्मचाऱ्यांचा हजेरी अभिलेख तयार करून कंपनीची तीन लाखांची फसवणूक

सागर हेमू राठोड (वय 30, रा. चिखली) यांची 25 हजारांची होंडा शाईन दुचाकी कृष्णानगर भाजी मंडई चौकातून तर मकसूद अली मेहबूब अन्सारी (वय 30, रा. कुदळवाडी, चिखली) यांची 15 हजारांची स्प्लेंडर प्लस दुचाकी त्यांच्या घरापासून चोरीला गेली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चैतन्य साठे (वय 22, रा. कात्रज) यांची आठ हजारांची हिरो होंडा पॅशन दुचाकी बिग बाजार येथून चोरीला गेली आहे. याप्रकरणी साठे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.