Pimpri-Chinchwad Boxing : स्टेट ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड संघ जाहीर

एमपीसी न्यूज – अठराव्या जुनियर (Pimpri-Chinchwad Boxing) मुलींचा राज्य बॉक्सिंग स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड जिल्हा बॉक्सिंग संघ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग संघटना आयोजित जोगेश्वरी मुंबई येथे दि. 6 ते 10 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहेत.

यामध्ये यासाठीची निवड चाचणी स्पर्धा पिंपरी येथे घेण्यात आल्या, संघ खेळाडू व वजन गट त्यानुसार सारंगी सातपुते (46 किलो) श्रद्धा तावरे (46 किलो) इशप्रीत कटारिया (52 किलो)

आवेरी लाटे (54 किलो) रेबिका दास (57 किलो) श्रावणी काटकर(80 किलो) यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड सिटी बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष रघुनाथ खेडकर ,उपाध्यक्ष विशाल वाळुंजकर उपस्थित होते.

Pune Crime : 24 तासात 3 खून; पुणे शहर हादरले

तर निवड चाचणी स्पर्धेसाठी पंच प्रमुख (Pimpri-Chinchwad Boxing) म्हणून मनोहर इंगवले, ऋषिकांत वचकल, राकेश यादव,नीतू सुतार यांनी काम पाहिले संघासोबत जाणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून सुकन्या सुर्वे व व्यवस्थापक जितू कटारिया यांची निवड करण्यात आली. यावेळी सूत्रसंचालन ऋषिकांत वचकल आभार राकेश यादव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.