Pimpri : निवडणूकपूर्व प्रभागातील जनतेला दिलेला शब्द पाळला – एकनाथ पवार

प्रभाग क्रमांक 11 मधील क्रीडांगणाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज – पूर्णानगर येथील शनिमंदिरा शेजारील पंडित दिनदयाळ उपाध्याय क्रीडांगणाचे रुप पालटले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकपूर्वी प्रभाग क्रमांक 11 मधील जनतेला दिलेला शब्द मी पाळला आहे. दोन वर्षात क्रीडागणांचे काम पूर्ण करुन आज (रविवारी) त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. भविष्यात लोकहिताच्या कामाना प्राधान्य देऊन प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात प्रभाग 11 ला रोल मॉडेल करु, असे अभिवचन एकनाथ पवार यांनी प्रभागातील नागरिकांना दिले.

प्रभाग 11 मधील शनिमंदिर शेजारील क्रीडागणांचे लोकार्पण महापाैर राहूल जाधव यांचे हस्ते करण्यात आला. तसेच जागतिक दर्जाचे आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले तीन मजली पर्यटन केंद्र पूर्णानगरमध्ये साकारत आहे. त्या पर्यटन केंद्राचे भूमिपूजन महापाैर राहूल जाधव व एकनाथ पवार हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास योगिता नागरगोजे, संजय नेवाळे,भीमा बोबडे, संतोष पाटील, मनोज लोणकर, श्रीकांत सवणे यांच्यासह नागरिक, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक 11 मधील पूर्णानगरच्या शनिमंदिराजवळ पंडीत दीनदयाल उपाध्याय क्रिडागंण विकसित करण्यात आले आहे. या मैदानावर 2 कोटी 70 लाख रुपये खर्च करण्यात आला. यावर स्केटींग रिंग, कब्बडी मैदान, टेनिस, पाथवे, क्रिकेट आदी मैदाने विकसित केली आहेत. त्या क्रीडांगणाचे लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच पूर्णानगर येथे जागतिक दर्जाचे तीन मजली पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, येत्या दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे ध्येय आहे. यामध्ये तीन मजली पर्यटन केंद्र, पाथ-वे, हिरवळ, खेळणी, तलाव आणि पक्षी निरीक्षण, चौपाटी आणि अॅडव्हेंचर पार्क, पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध राहणार आहे.

भोसरी विधानसभेतील प्रभाग कमांक 11 मधील नागरिकांना दिलेला शब्द, मी पाळणारा कार्यकर्ता आहे. प्रभागातील नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, स्वस्त घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर आदी परिसरातील विविध आरक्षित जागेचे भूसंपादन करुन तेथील नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात येतील. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात प्रभाग 11 हा निश्चित रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.