Eknath Shinde Update : शिवसेनेला खिंडार? प्रसारमाध्यमांवर राजकारण्यांचा गडगडाट

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपला यश मिळाले ज्याची काल राज्यभर चर्चा होत राहिली; मात्र आज राज्यातील शिवसेनेतील खळबळीने पुन्हा राज्य चर्चेत आले आहेत. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) आणि त्यांचे 13 समर्थक आमदार नाॅटरिचेबल असल्याची माहिती समोर आली, त्यामुळे शिवसेनेतील हे आमदार भाजपशी हात मिळवणी करणार का अशी उलट – चर्चा राज्यात सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सोशल मिडीयावर त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांनी काही आमदारांसह बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. राजकीय नेते सोशल मिडीयावर यासंबंधी व्यक्त होत असून एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला कोणी समर्थन देत असून कोणी टिका – टिप्पणी मध्ये व्यस्थ असल्याचे दिसून येत आहेत.

Shivsena MLA : शिवसेनेचे १३ हून जास्त आमदार फुटणार?; अनेक जणांचा मोबाईल बंद

केंद्रीय नारायण राणे यांनी राज्यातील घडणाऱ्या बंडाविषयी आपले मत व्यक्त केले आहे. राणे लिहितात, “शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता.” असे म्हणून राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या कृतीचे समर्थन करून सांकेतिक स्वरूपात इशारा दिला आहे.

Eknath Shinde First Reaction : बंडानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; सत्तेसाठी बाळासाहेबांच्या शिकवणीशी प्रतारणा करणार नाही

सोशल मिडीयावर केवळ नारायण राणेच नव्हे तर त्यांते सुपुत्र निलेश राणे यांचे सुद्धा ट्विट करून “ठाकरेंचे दिवस फिरले…” असे म्हणून केवळ तीन शब्दांमध्ये राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

या संपुर्ण घटनेवर शिवसेनेमध्ये खलबतं सुरू झाली आहेत. काही शिवसेना नेते माध्यमांसमोर येत पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अचानक झालेल्या या बंडनाट्यामुळे शिवसेनेला चौफेर टीकेला सामोरे जावे लागत आहे. यावर प्रत्युतर देत शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोशल मिडीयावर त्यांचे मत व्यक्त करून उगाच टीका – टीप्पणी करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

सय्यद लिहितात, “माननीय.एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणनार्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे उगाच भाजपच्या IT CELL च्या लिंबु टिंबुनी सोशल मिडीयावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही.”

मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update) यांच्यासोबत आणखी काही आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यात सध्या एकच खळबळ सुरू आहे. या बंडनाट्याचे पडसाद राज्यातील राजकारणावर कसे पडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.