Eknath Shinde : एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात भूकंपाची शक्यता

एमपीसी न्यूज – राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकांच्या घोषणेपासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेतही भाजपनं आपली जादू दाखवत महाविकास आघाडीला (Eknath Shinde) मोठा धक्का दिला आहे.त्यातच महाविकास आघाडीतील अंतर्गत धूसफूस चव्हाट्यावर आली आहे.

Promote Small Entrepreneurship : लघु उद्योगजकतेला प्रोत्साहन’ देण्यासाठी बस यात्रा; महापालिकेकडून स्वागत

 

विधान परिषद निवडणूकीत शिवसेनेची मत फुटल्यानंतर आता शिवसेनेत फूट पडणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. कारणंही तसंच आहे, शिवसेनेतील प्रबळ नेतेत आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) त्यांच्या गटातील आमदारांसह नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे.त्यामुळे शिवसेनेत फूट पडणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

शिवसेना नेते शिवसेनेला जोरदार धक्का देणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात होत आहे. अशातच नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समजत आहे.कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट  नॉट रिचेबल आहेत. काल एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्वाची बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यातच आता राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून त्याचे केंद्र गुजरात नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.