Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावलेला फलक शिवसैनिकांनी फाडला

एमपीसी न्यूज – शिवसेनेत बंडखोरी केलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ मोरवाडी चौकात लागलेला फलक शिवसैनिकांनी फाडला. आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक असा मजकूर फलकावर लिहिला होता. शिवसैनिकांनी काही वेळातच हा फलक फाडला. फलकवरील शिंदे यांच्या फोटोला जोडे मारले. शिवसेना अंगार है, बाकी सब भंगार है, अशा जोरदार घोषणा दिल्या.  दरम्यान, हा फलक नेमका कोणी लावला होता, हे पुढे आले नाही.

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतच बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना समर्थन दिलेल्या अपक्ष अशा 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघत आहेत. पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

Ekanath Shinde : शिवसेनेच्या संपर्कातील आमदारांची नावे जाहिर करा – एकनाथ शिंदे

संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या नेतृत्वातील बैठकीत सर्वांनी ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही एकनाथ शिंदे साहेब समर्थक, #wesupporteknathshinde असा मजकूर लिहिलेला फलक मोरवाडी चौकात झळकला. त्यामुळे खळबळ उडाली. हा फलक लागल्याचे कळताच शिवसैनिक एकत्र आले. त्यांनी हा फलक फाडून टाकला. चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, रोमी संधू, गणेश अहिर, तुषार नवले, गोरख पाटील, प्रदीप दळवी (Eknath Shinde) आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.