Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण मागण्यापेक्षा स्वतंत्र्य पक्ष काढावा – शरद पवार

एमपीसी न्यूज – शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाईवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी भाष्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला देताना शरद पवार म्हणाले की, शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण हे चिन्ह मागण्यापेक्षा स्वतंत्र्य पक्ष काढावा. एखाद्या पक्षाचे अशा प्रकारे चिन्ह काढून घेणे योग्य नव्हे.मी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर स्वतंत्र्य पक्ष काढला, वेगळ चिन्ह घेतले. मी काँग्रेस पक्षांचे चिन्ह मागितले नाही. त्यातून वाद वाढविणे योग्य नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.ते बारामतीमध्ये पत्रकार परीषदेत बोलत होते.

शरद पवार यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा पक्षांतरबंदी कायदाच अस्तित्वात नव्हता. आज तो कायदा आहे. आज कायदे तयार झाले म्हणून शिंदे साहेब म्हणजे शिवसेना कायदेशीर लढाई लढत आहे, असे फडणवीस म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.