Eknath Shinde Update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिंतेत; तर गुवाहाटीमध्ये होत आहे वाढदिवसाचे सेलिब्रेशन

खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा काहीही फरक या मंत्र्यांना पडला नाही...

एमपीसी न्यूज : एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे (Eknath Shinde Update) चिंतेत आहेत. एक एक करून रोजच्या रोज शिवसेनेचे मोठे मंत्री बाहेर पडत आहेत. या काळजीत असताना दुसरीकडे मात्र शिंदे गट उत्साहात सेलिब्रेशन करत आहे. गुवाहाटीमध्ये आज भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

गुवाहाटी येथील एकनाथ शिंदे गटाने महाराष्ट्रातील भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस साजरा केला. गुवाहाटी येथील हॉटेल रेडिसन ब्लू येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. शिंदे यांनी नरेंद्र भोंडेकर यांना केक खाऊ घातला. तसेच, पुष्पगुच्छही दिला. तर भोंडेकर यांनी चरणस्पर्श करून एकनाथ शिंदे यांच्याकडून आशीर्वादही घेतले. बंडखोर आमदारांचा असा उत्साह पाहता खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा काहीही फरक या मंत्र्यांना पडला नसल्याचे असे एकूण चित्र दिसत आहे.

आमदारांनी हॉटेल बुकिंग वाढवले

विशेष म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde Update ) गटाच्या आमदारांचा गुवाहाटीत दीर्घकाळ राहण्याचा मानस असल्याचे दिसत आहे. आता गुवाहाटी येथील रेसिडेंट ब्लू हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांनी हॉटेलचे बुकिंग आणखी वाढवले ​​आहे. यापूर्वी ही बुकिंग फक्त 7 दिवसांसाठी होती, मात्र आता ती आणखी दोन दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. आता बंडखोर आमदार 28 नव्हे तर 30 जूनला मुंबईत येऊ शकतात.

Eknath Shinde Update : शिवसेनेचा आणखी मोठा नेता शिंदे गटात सामील?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.