22.4 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

Eknath Shinde Update : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सुनील प्रभू आणि गटनेते अजय चौधरी यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील (Eknath Shinde Update) राजकीय वादंग आता सुप्रीम कोर्टात पोहचला. सुप्रीम कोर्टाने याबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली. गटनेते अजय चौधरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि प्रतोद सुनील प्रभू यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे.

“अति घाईमुळे चुकीचे परिणाम होऊ शकतात,असे सर्वोच्च न्यायालयाने डेप्युटी स्पीकरला सांगितले. सर्व पक्षांना पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्राला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाला तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला 39 बंडखोर आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यास सांगितले असून सर्वोच्च न्यायालयाने 39 आमदारांच्या जीवाला, स्वातंत्र्याला आणि मालमत्तेला कोणतीही हानी पोहोचवली जाणार नाही असे आश्वासन राज्य सरकारच्या वकिलाकरवी नोंदवले आहे.

Voter Lists : राजकीय हस्तक्षेप झालेल्या मतदार याद्या बदला अन्यथा, ‘हक्कभंग’ – उमा खापरे

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले.

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाने विचारले कि हायकोर्टात न जाता थेट सुप्रीम कोर्ट गाठण्याचे कारण काय? त्यावर शिंदे गटाने उत्तर दिले, कि मुंबईमध्ये (Eknath Shinde Update) आमच्या जीवाला धोका आहे. आमचे मृतदेह आणण्याचे जाहीर रित्या सांगितले जात आहे. या शिवाय अल्पमतातले मंत्री राज्याचे नुकसान करत असून 226 चे अस्तित्व कलम 32 ला लागू करण्यासाठी घटनात्मक प्रतिबंध नाही.

spot_img
Latest news
Related news