Eknath Shinde : बंडखोर आमदारांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा

एमपीसी न्यूज : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या 15 बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली आहे. आता त्यांना सीआरपीएफची सुरक्षा देण्यात आली आहे.

या आमदारांच्या घरीही सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. आमदारांच्या घरांवर आणि कार्यालयांवर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. अपात्रतेच्या नोटिसा मिळालेल्या 16 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या नव्या नेत्याच्या निर्णयाला बंडखोर आमदारही न्यायालयात आव्हान देणार आहेत.

Mula Mutha River Crises : विकास की भकास? नदीपात्रांमध्ये अपरिवर्तनीय आणि आमुलाग्र विघातक विकास कामांचे आक्रमण

आजचे 2 मोठे अपडेट्स… Eknath Shinde

1. शिवसेनेतील बंडखोरी रोखण्यासाठी उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही मोर्चेबांधणी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना मेसेज पाठवून त्यांच्या पतींची समजूत घालण्यास सांगितले आहे. रश्मी यांनी काही बंडखोर आमदारांच्या पत्नींशीही फोनवरून बातचीत केली आहे.

2. देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत पोहोचू शकतात. तेथे जाऊन ते पुढील रणनीती ठरवणार आहेत. फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री वडोदरा येथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

शिंदे-फडणवीस भेट आणि शिवसेनेची उच्चस्तरीय बैठक शनिवारी पाचव्या दिवशी पार पडली. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, कि शिंदे पूर्वी नाथ होते, पण आता गुलाम झाले आहेत. उद्धव यांच्या बैठकीत सहा ठराव मंजूर करण्यात आले. बंडखोर गटाने शिवसेनेच्या (बाळा साहेब) नावाने नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना बाळासाहेबांची आहे. बाळासाहेबांचे नाव कुणालाही वापरू दिले जाणार नाही. दुसरीकडे, असेही वृत्त आहे की शुक्रवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे गुवाहाटीहून इंदूरमार्गे वडोदरा येथे गेले होते. जिथे त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

संध्याकाळी उशिरा, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले- प्रिय शिवसैनिकांनो… नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! शिवसेना आणि शिवसैनिकांना MVA च्या अजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताचा आहे.

Vijay Gupta : पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही – विजय गुप्ता

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.