Ekvira Devi : एकविरा देवी मंदिर, लेणी जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी 39 कोटींचा निधी मंजूर 

एमपीसी न्यूज : आगरी कोळी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मावळातील आई एकविरा देवी मंदिर व लेणी जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यासाठी (Ekvira Devi) सुमारे 39 कोटी 43 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याने आमदार सुनिल शेळके यांच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळाच्या सन 2020 रोजीच्या हिवाळी अधिवेशनात आभाराच्या भाषणात केलेल्या घोषणेनुसार व दि.23 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडी सरकारने प्राचीन मंदिरे, लेण्या संवर्धन करण्याबाबत बृहत विकास (Ekvira Devi) आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार .दि.30 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील 8 प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यास मान्यता देण्यात आली होती.

Alandi garbage issue : आळंदी जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कचऱ्याचा ढीग

त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आगरी-कोळी बांधवांचे कुलदैवत, आपल्या मावळ तालुक्यातील कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिराचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात सुमारे 101 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती.(Ekvira Devi) त्यांपैकी मावळातील कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिर व लेणी जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यासाठी सुमारे 39 कोटी 43 लाख रुपयांच्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली आहे.

आगामी काळात रोप वे,भक्त निवास व आवश्यकतेनुसार भौतिक सोयी सुविधांसाठी सरकारकडे पाठपुरावा करुन ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास कटिबद्ध असेल, असे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.