Ekvira devi mandir : आई एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना 

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला (लोणावळा) गडावरील आई एकविरा देवीच्या मंदिरात आज सकाळी विधिवत घटस्थापना करण्यात आली.(Ekvira devi mandir) पहाटे देवीचा अभिषेक व आरती करत घटाची माळ लावण्यात आली.

देवीचा पहाटेचा अभिषेक लोणावळा ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने व वेहेरगावच्या सरपंच अर्चना संदीप देवकर यांच्या हस्ते करण्यात आला.(Ekvira devi mandir) तर घट बसविण्यासाठी देवीचे गुरव (देशमुख परिवार) व पुजारी (गोविलकर, खिरे) तसेच मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते घटाची माळ लावण्यात आली.

Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर राजीनामा देईन – तानाजी सावंत 

मागील दोन वर्ष कोरोनामुळे देवीचा नवरात्र उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र घट बसविण्यासाठी व देवीचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून भाविकांनी गडावर गर्दी केली होती. भाविकांच्या गर्दीने कार्ला गड दुमदुमला होता.(Ekvira devi mandir) देवीचे मंदिर व चौघड्यांला आकर्षक फुलांचे डेकोरेशन करण्यात आले असून गड परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.