Lonavala : एकविरा देवी पायथा मंदिरासमोरील काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सदस्य बाबुराव वायकर यांच्या प्रयत्नातून एकविरा देवी पायथा मंदिरासमोर काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (दि. 22) पार पडला.

लोकार्पण सोहळ्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिलींद बोञे, बाळासाहेब भानुसघरे, सरपच दत्तात्रेय पडवळ, बबनराव माने, मधुकर पडवळ, संतोष रसाळ, सरपंच हेमंत भानुसघरे, बाळु भानुसघरे, अरूण भानुसघरे, शाताराम शेलार, संजय देवकर, पिंटू गायकवाड, शंकर पडवळ, दत्ताञय बोञे, बंडू मोहीते, संभाजी भानुसघरे, सोमनाथ बोञे, निवृत्ती बोञे, कल्पना माने आदी उपस्थित होते.

एकविरा देवी पायथा मंदिराजवळ रस्त्याची आवश्यकता होती. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी भाविक येतात. रस्ता नादुरुस्त असल्यामुळे भाविकांना नाहक त्रास होत होता. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर यांनी त्यांच्या प्रयत्नातून हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. यामुळे भाविकांची गैरसोय थांबली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.