_MPC_DIR_MPU_III

Maval : सुनील शेळके आमदार व्हावेत म्हणून मावळ गोळीबारातील जखमी शेतकऱ्यांनी घातले आई एकवीरा देवीला साकडे

एमपीसी न्यूज – मावळ मतदारसंघातून सुनील शेळके हेच आमदार व्हावेत म्हणून मावळ गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी कार्ला गडावरील आई एकविरा देवीला आज साकडे घातले. 
_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत मावळच्या उमेदवाराचे नाव जाहीर न झाल्याने तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या उमेदवारी मिळण्याच्या आशा आणखी उंचावल्या आहेत. त्यातच पवना गोळीबारात जखमी झालेल्या अमित दळवी, योगेश तुपे, अजित चौधरी, विशाल राऊत, मारुती खिरिड, शिवाजी वरवे, नवनाथ गराडे, गणेश तरस या शेतकऱ्यांनी आज कार्ला गडावर जाऊन आई एकविरा देवीला सुनील शेळके यांना यश देण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली.
आतापर्यंत मावळात पवना गोळीबाराचे फक्त राजकारण केले गेले. राजकारण करणाऱ्या नेत्यांनी आम्हाला कधीही मदत केली नाही पण सुनील यांनी आम्हाला संकटसमयी वारंवार मदत केली. त्यामुळे आम्ही शेळके यांच्यासाठी देवीला प्रार्थना केली, असे या शेतकरी तरूणांनी सांगितले.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.