Pune : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन

एमपीसी न्यूज –  ज्येष्ठ पत्रकार, क्रीडा संघटक, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे संघटक, महाराष्ट्र अॅथलेटिक असोसिएशनचे सचिव प्रल्हाद सावंत (वय 67) यांचे आज दुपारी निधन झाले.

त्यांची उद्या (शुक्रवार) सकाळी 9 वाजता त्यांच्या पत्रकार नगर, शरयू बिल्डिंग येथील राहत्या घरापासून निघणार आहे. तर  सकाळी 9.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.