Accident News : नवलाख उंब्रे येथे क्रेनच्या धडकेत वृद्ध गतप्राण

एमपीसी न्यूज – नवलाख उंब्रे येथे रस्ता ओलांडत असताना क्रेनच्या जोरदार धडकेने नवलाख उंब्रे येथील वृद्धाच्या दोन्ही पायावरून क्रेनचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सोपान मानाजी पडवळ (वय 80) असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांच्या जाण्याने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

नवलाख उंब्रे येथील मुख्य चौक अपघात प्रवणक्षेत्र बनला असून तिथे त्वरित उपाययोजना करण्यात आल्या पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहेत. दरम्यान, नवलाख उंब्रे परिसर एमआयडीसी क्षेत्र असल्याने अवजड वाहनांची वर्दळ खूप असते. गावातील मुख्य रस्ता हा एमआयडीसी रस्त्याला लागूनच असल्याने बऱ्याच वेळा मुख्य चौकात अपघात होत असतात.

तिथे रिफ्लेक्टर मिरर, गतिरोधक व सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे होत आहे. मुख्य चौकामध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे नजीकच असलेल्या एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व क्रेनचालक आणि क्रेन ताब्यात घेण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.