ज्येष्ठ महिलेला तिघांनी शिवगाळ करत केली मारहाण

एमपीसी न्यूज- आमच्या हद्दीत गाय का बांधली म्हणून 57 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेला तिघांनी मारहाण करत शिवीगाळ केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.3) सकाळी नऊ वाजता तळेगाव स्टेशन चौक येथील एका बंगल्या समोरील मोकळ्या जागेत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली असून महिलेचा दीर, जाऊ व पुतण्या अशा तिघांवर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

PCMC School News: विद्यार्थ्यांना दहा दिवसांत गणवेश मिळणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती व दोन मुले यांना आरोपींना तुमची गाय तुम्ही आमच्या हद्दीत का बांधली म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच झाडाच्या फांदी व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यास सुरुवात केली. फिर्यादी धक्काबुक्कीत खाली पडल्या यावेळी त्यांना सिमेंटचा ब्लॉक फेकुन मारत जखमी केले, अश्लिल शिवीगाळ करत फिर्यादीचा विनयभंग केला. यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.