शुक्रवार, डिसेंबर 2, 2022

Election Commission : मतदार नोंदणीसाठी आता वर्षातून चार वेळा संधी

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगामार्फत (Election Commission) लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा करण्यात आल्याने वयाची 18 वर्ष पुर्ण होणाऱ्या व्यक्तींना 1 जानेवारी 2023, 1 एप्रिल 2023, 1 जुलै 2023 व 1 ऑक्टोबर 2023 रोजी असे वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.

सद्यस्थितीत भारत निवडणूक आयोगाचा छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्यानुसार 8 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये मतदार यादीत अजून नाव समाविष्ट नसलेल्या 18 वर्षावरील सर्व पात्र व्यक्तीना नाव नोंदविण्यासाठी नमुना अर्ज भरता येणार आहे.

पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन सर्व त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळावरुन तसेच Voter Helpline App आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन नमुना अर्ज क्र.6 भरावा किंवा आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

Mahavitaran : तब्बल 89 हजार पुणेकरांकडून वीज बिलांच्या छापील कागदाचा वापर बंद

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 26 व 27 नोव्हेंबर 2022 रोजी तृतीयपंथी समुदाय, देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि भटक्या व विमुक्त जमातींच्या व्यक्तींसाठी नियोजित ठिकाणी व 3 व 4 डिसेंबर 2022 रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी सर्व अर्हता पात्र नागरिकांनी या विशेष शिबीरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Latest news
Related news