Election News : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

पाचही राज्यातील मतमोजणी 2 मे रोजी होणार

एमपीसी न्यूज – पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज (शुक्रवारी, दि. 26) जाहीर झाला. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

पश्चिम बंगालमधील मतदान आठ टप्प्यात होणार आहे. मागील वेळी पश्चिम बंगालमधील मतदान सहा टप्प्यात झाले होते. यंदा निवडणुकीचा पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा 29 एप्रिल रोजी होणार आहे.

आसाममधील निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल आणि तिसरा टप्पा 6 एप्रिल रोजी होणार आहे.

केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या तिन्ही राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

पाचही राज्यातील मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे.

पुदुच्चेरीमध्ये मुख्यमंत्री नारायणसामी यांनी बहुमत गमावल्याने तिथे निवडणूक होत आहे. तसेच जयललिता आणि एमकरुणानिधी यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडू येथे प्रथमच निवडणूक होत आहे.

आसाम 126, पश्चिम बंगाल 294, तामिळनाडू 234, केरळ 140, पुदुच्चेरी 30 अशा पाच राज्यातील विधानसभेच्या 824जागांसाठी ही निवडणूक होईल.

मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेतली जाणार आहे. कोरोनामुळे मतदानाची वेळ एक तासाने वाढविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.