Sindhu Seva Dal : सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक वासवानी यांची निवड

एमपीसी न्यूज –  सिंधू सेवा दलाच्या (Sindhu Seva Dal) 2022-25 या तीन वर्षांची नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी अशोक वासवानी, तर उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम पर्यानी, सचिवपदी सचिन तलरेजा यांची निवड करण्यात आली आहे.

निवड झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. राम जवाहारानी बोलत होते. सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक वासवानी, उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम पर्यानी, सचिवपदी सचिन तलरेजा, तर खजिनदारपदी राजेंद्र फेरवानी, सहसचिवपदी किरण फेरवानी, सह खजिनदार पदी निलेश फेरवानी तर जनसंपर्क अधिकारी म्हणून देवेंद्र चावला यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी अध्यक्ष डॉ. पीटर दलवानी, मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, जय पिंजानी व हरीश पिंजानी यांची निवड झाली.

Kondhwa Police : महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोंढवा पोलिसांना न्यायालयाचा दणका, वाचा काय झालं?

या कार्यक्रमावेळी सिंधू सेवा दलाच्या वतीने एएनपी केअर फाउंडेशनच्या सहकार्याने ‘ग्लोबल सिंधी’ या मॅट्रीमोनी अॅपचे अनावरण करण्यात आले. सिंधू सेवा दलाचे संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, उद्योजक सुनील अडवाणी, घनश्याम सुखवानी आदी उपस्थित होते. तर, सूत्रसंचालन सुरेश जेठवानी (Sindhu Seva Dal) यांनी केले व आभार विजय दासवानी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.