Vadgaon Maval : खादी ग्रामोद्योग संघाची निवडणूक बिनविरोध

एमपीसी न्युज – मावळ तालुका विविध कार्यकारी खादी ग्रामोद्योग संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली (Election of Khadi Gramodyog Sangh). संघाच्या ११ जागांपैकी १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उमेदवारी अर्ज न आल्याने एक जागा रिक्त राहिली आहे.

मंगळवारी (दि. १) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दहा जागांसाठी दहा अर्ज राहील्याने निवडणुक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही पी कोतकर यांनी पत्राद्वारे जाहीर केले. त्यांना सचिव श्रीरंग पिचड यांनी सहकार्य केले.

Pune chandani chowk : चांदणी चौकातील उड्डाणपूलाच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी

संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक व संघाचे विद्यमान अध्यक्ष अंकुश आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत सर्वसाधारण गटातुन उमाजी रमाजी भांडे, चंद्रकांत चिंधु दहिभाते,सुरज मदन बुटाला,अंकुश रामचंद्र आंबेकर,सुदेश एकनाथ गिरमे,गणेश बाजीराव भांगरे, महीला गटातुन कांचन लक्ष्मण भालेराव व कल्पना सुनिल कांबळे, अनुसुचित जाती जमाती गटातुन अमित पांडुरंग ओव्हाळ, तर इतर मागास प्रवर्गातुन सोपान धोंडीबा कदम हे बिनविरोध निवडून आले तर भटक्या विमुक्त जमाती गटात अर्ज न आल्याने ती जागा रिक्त राहीली

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष जाधव, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कैलास गायकवाड, भाजपा नेते संदीप बुटाला,नगरसेवक चंद्रजित वाघमारे, आरपीआयचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, बबनराव ओव्हाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य किसन कदम, समीर जाधव, सतीश येवले यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.