Gujarat-Himachal Pradesh : विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीवर; तर ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव पडला कमी

एमपीसी न्यूज : देशभरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat-Himachal Pradesh) वातावरण आहे. दिल्लीमध्ये ‘आप’ने जोरदार विजय मिळवल्यानंतर सर्वांचे लक्ष आता गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. गुजरातमध्ये भाजपने प्रारंभीच मोठी आघाडी घेतली आहे, तर आम आदमी पार्टी राज्यातील आदिवासी भागात जोरदार लढत देत आहे. काँग्रेस मात्र 2017 च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या नफ्यावर एकवटण्यात अपयशी ठरली आहे. कारण ‘भारत जोडो यात्रे’मध्ये संख्येचा प्रभाव दिसून आला असला तरी त्याचा प्रचारावर आणि निकालावर काहीच परिणाम दिसून येत नाहीये.

एक्झिट पोलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन भाजप गुजरातमध्ये पुन्हा सत्तेत येणार आहे. भाजपने 182 पैकी 127 विधानसभा जागा जिंकण्याचा 2002 चा विक्रम मोडीत काढला आहे. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार भाजपने 2017 चा आकडा बाधित ठेवला आहे. तर दुसरीकडे आपचे खाते एका छोट्या पण महत्त्वपूर्ण मार्गाने उघडेल. अंदाजानुसार भाजप 128/129 -149/151 जागांवर आपले वर्चस्व मिळवू शकेल.

Pimpri News : 42 भारतीय सैन्य अधिकाऱ्यांना अभियांत्रिकी पदवी प्रदान

आता पाहूया हिमाचल प्रदेशमध्ये कोण बाजी मारू शकेल?

हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या निकालात भाजप आणि काँग्रेसमध्ये (Gujarat-Himachal Pradesh) चुरशीची टक्कर होती. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, 68 पैकी 63 जागांचे कल आले होते. भाजप 30 जागांवर आघाडीवर होती तर काँग्रेसही 30 जागांवर आघाडीवर होती. 3 जागांवर अपक्ष पुढे होते. पण, भाजपने बाजी मारत 36 जागांवर मुसंडी मारली आणि कॉँग्रेसला 3 अधिक जागांवर म्हणजे 33 जागांवर समाधान मानावे लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.