Cantonment Election : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील 57 बोर्डांच्या निवडणुका रद्द!

एमपीसी न्यूज : पुणे कँन्टोमेंट बोर्डासह देशभरातील 57 बोर्डांच्या निवडणुका जााहीर झाल्या होत्या, संरक्षण मंत्रालयाने आज त्या रद्द केल्या आहेत. (Cantonment Election) संरक्षण मंत्रालयाच्या राजपत्रानुसार आजपासून 17 मार्च पासून निवडणुकविषयीचे सर्व कामकाज थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

याबाबत पुणे कँन्टोमेंट बोर्डाच्या कार्यालयात विशेष राजपत्रविषयीची सूचना लावण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा 2006 च्या अधिनियम 41 च्या आधारे ही 30 एप्रिल रोजी निवडणूक होणार होती. त्याबाबत 18 फेब्रुवारीला राजपत्राद्वारे सूचना देण्यात आली होती.

 

Maharashtra : महिलांना आजपासून अर्ध्या किंमतीत एसटी प्रवास; आदेश जारी

 

देशातील 57 कॅन्टोन्मेंट बोर्डात सध्या प्रशासक कार्यरत आहे. नोव्हेंबर 2021 बोर्डाच्या सदस्यांचे सभासदत्व संपले असून बोर्डातील कारभार त्रिसदस्यीय समिती पाहत आहे. आतापर्यंत दोन वेळेस मुदतवाढ देण्यात आली होती. आता अचानक निवडणूक रद्द झाल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव राकेश मित्तल यांनी यासंदर्भात अधिसूचना काढली होती. या अधिसुचनेनुसार देशभरातील 62 पैकी 57 कँटोन्मेंटच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. (Cantonment Election) यामध्ये छावण्यांमध्ये पुणे, खडकी, नगर, औरंगाबाद, नाशिकमधील देवळाली आणि नागपूरमधील कामठी या राज्यातील अशा एकूण सहा कँटोन्मेंट बोर्डांची देखील निवडणूका पार पडणार होत्या. मात्र आता या निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.