Pune Election 2022: प्रारुप मतदार यादीवर 4,000 हून अधिक हरकती प्राप्त

एमपीसी न्यूज: पुणे महानगरपालिकेला गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीवर 4,273 हरकती प्राप्त झाल्या आहेत. (Pune Election 2022) सर्वात कमी हरकती या औंध-बालेवाडी प्रभागातून, तर सर्वाधिक हरकती या रामनगर-उत्तमनगर-शिवणे प्रभागातून नोंदवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ३ जुलै ही आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख होती.

पुणे महानगरपालिकेला राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी करण्यास सांगण्यात आले हाेते. त्यानुसार पालिकेने 23 जून रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करत 1 जुलैपर्यंत मतदारांच्या सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. नंतर ही मुदत 3 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती.

प्रारूप मतदार यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रभाग कार्यालये आणि निवडणूक कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली होती. नागरिकांना आपल्या सूचना व हरकती ऑनलाईन किंवा प्रत्यक्षपणे जवळच्या प्रभाग कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मतदार नोंदणी ही भारतीय निवडणूक आयोगा (ECI) द्वारे केली जाणार असून 31मे पर्यंत नोंदणी केलेल्याच मतदारांच्या नावाचा समावेश यादीत केला जाणार आहे.

 

PCMC Election 2022 : प्रारुप मतदार यादीवर 8 हजार 700 हरकती

“मतदार यादीवर जनतेच्या सूचना आणि हरकती मागवण्याच कारण म्हणजे मतदानाच्या दिवशी नाव गहाळ होणे किंवा प्रभाग बदलणे अशा स्वरूपाच्या कोणत्याही तक्रारी येऊ नयेत यासाठीच मतदार यादीवर जनतेच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या.  अशा प्रकारे, मतदारांना त्यांचे नाव पडताळण्याचे आणि आपापल्या प्रभागातील मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याचे आवाहन केले असल्याचो पीएमसी निवडणूक विभागाचे प्रभारी यशवंतराव माने यांनी सांगितले.

 

 औंध-बालेवाडी प्रभागात एक तर बाणेर-सुस-महाळुंगे प्रभागात तीन, पाषाण-बावधन प्रभागात चार, बोपोडी-पुणे विद्यापीठ प्रभागात सहा तर खराडी-वाघोली, शिवाजीनगर-संगमवाडी आणि सदाशी पेठ-नवीपेठ प्रभागात प्रत्येकी सात हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

 

 12 प्रभागात प्रत्येकी एक हरकत नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे, नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या उपनगरीय भागात मतदार यादीवर सर्वाधिक आक्षेप नोंदवले गेले.  (Pune Election 2022) रामनगर-उत्तमनगर-शिवणे प्रभागातून सर्वाधिक 324 हरकती आल्या असून त्यापाठोपाठ सुखसागरनगर-राजीव गांधीनगर प्रभागातून 278 हरकती आल्या आहेत. धायरी-आमडेगाव प्रभागात 251, कात्रज-गोकुळनगर प्रभाग 248 आणि कोरेगाव पार्क-मुंढवा प्रभागात 23 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.