Electric Vehicle : टेस्ला, एमजी, व्होल्व्होसह ‘या’ इलेक्ट्रिक कार आहेत आगामी आकर्षण   

एमपीसी न्यूज – मागील काही वर्षांत जगभरातील वाहन उद्योगात परिवर्तनाने प्रचंड वेग धारण केला आहे. 2017 ते 2018 या काळात जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 65 टक्क्यांनी वाढली. या काळात 2.1 दशलक्ष वाहने तयार झाली. कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे 2020 मधील पहिल्या तिमाहित 25 टक्के विक्री घटली. 

ब्लूमवर्ग न्यू एनर्जी फायनान्स (बीएनईएफ) नुसार ईव्हीची मागणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. सुधारीत बॅटरी, चार्जिंगची उपलब्ध सुविधा, नवी बाजारपेठ आणि कंबनशन इंजिन (आयसीई) वाहनांनुसार किंमत अशी वैशिष्ट्ये आहेत. एका अहवालानुसार 2025 पर्यंत जगभरातील प्रवासी वाहनांची विक्री 10 टक्क्यांनी वाढेल. 2030 मध्ये ती 28 टक्के तर 2040 पर्यंत 58 टक्के होईल. याच अनुषंगाने जाणून घेऊयात आगामी काळात रस्त्यावर अवतरणा-या टॉप पाच इलेक्ट्रिक कारबद्दल.

एमजी सायबर्स्टर : जगातील पहिली शुद्ध इलेक्ट्रिक सुपर स्पोर्ट्स गेमिंग कॉकपीट एमजी सायबर्स्टरची लवकरच मोठ्या प्रमाणावर निर्मिती होणार आहे. एक्सटेरिअरमध्ये एमजी सायबर्स्टररने टीकाऊ एमजीबी रोडस्टर्स क्लासिक कन्हर्टेबल बॉडी स्टाइल असून सॉलीड स्पोर्ट्स कार पोश्चर मिळते. ‘विंडहंटर’ फ्रंट फेस डिझाइन हे अगदी वेगळे आहेत.

मोड्युलर बॅटरी (सीटीपी) टेक्नोलॉजी असल्याने 800 किमीचा अल्ट्रा लाँग एंड्युरन्सदेखील मिळतो. ती 0-100 किमी/तास वेग फक्त 3 सेकंदात धारण करण्यास सक्षम आहे. यात ऑटोनॉमस एल 3 इंटेलिजंट ड्रायव्हिंग सिस्टिम आहे. एमजी सायबर्स्टर ही केवळ संकल्पनाच नसून, ती लवकरच मोठ्या प्रमाणावर उत्पादित होण्याची अपेक्षा आहे.

_MPC_DIR_MPU_II

टेस्ला मॉडेल 3 : टेस्लाने अखेर बहु प्रतीक्षित कारची पहिली आवृत्ती उत्पादित केली आहे. हे प्रीमियम रेंज मॉडेल 44 हजार डॉलरमध्ये उपलब्ध असून 500 किमी / 310 मैलांपर्यंत पोहोचते. या रेंजमध्ये प्रथमच एवढी किफायतशीर किंमत देण्यात आली आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक कारचा काळ अधिकृतरित्या आला आहे, हे नक्कीच म्हणता येईल.

व्होल्व्हो एक्ससी 40 रिचार्ज : वोल्व्होने पहिली पूर्ण इलेक्ट्रिक एक्ससी 40 रिचार्ज कार ऑक्टोबर 2019 मध्ये आणली असून त्यात अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. गूगलच्या नव्या अँड्रॉइड ऑटोमेटिव्ह सॉफ्टवेअर सपोर्टेड इन्फोटेनमेंट सिस्टिमही यात आहे. टेस्लाकडून प्रेरणा घेत, वोल्वोने तयार केलेली ही पूर्ण इलेक्ट्रिक कार बाजाराला धक्का देऊ शकते.

रेंज : 400 किमी / 250 मैल 

किंमत : 45,600 डॉलर (अंदाजे)

ऑडी ए9 ईट्रॉन (प्राथमिक नाव) : 2018 मध्ये ऑडी एसयूव्ही लाँच केल्यानंतर ऑडी पूर्णपणे इलेक्ट्रिक लक्झरी सेडान 2024 पर्यंत लाँच होण्याची अपेक्षा आहे. ए9 ईट्रॉन हे ऑडीचे कॉम्बॅट टेस्लाचे मॉ़डेल एस आहे. या कारमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंगचीही सुविधा असेल. ऑडीच्या प्रमुखांनी घोषणा केली की, बॅटरीवर चालणाऱ्या सर्व ऑडीकारपैकी 25 टक्के कार मालकी घेण्याची कंपनीची योजना आहे.

बीएमडब्ल्यू एक्स 3 / बीएमडब्ल्यू 4 सीरीज जीटी : बीएमडब्ल्यूने त्यांच्या आय 5 योजना रद्द केल्या असून आता एक्स 3 आणि 4 सीरीज जीटीसारख्या इतर सीरीजचे इलेक्ट्रिफिकेशन करण्यावर ते भर देत आहेत. बीएमडब्ल्यूच्या कॉम्बॅटनंतर टेस्लाचे मॉडेल 3 हे 2021 पर्यंत लाँच होण्याचा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.