Dighi News : लिगसी सनिधी सोसायटीत इलेक्ट्रिक डीपीला आग

एमपीसी न्यूज – दिघी मधील शंकर मंदिराजवळ असलेल्या लिगसी सनिधी सोसायटीच्या इलेक्ट्रिक डीपीला आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. 17) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील लिगसी सनिधी सोसायटी मध्ये असलेल्या इलेक्ट्रिक डीपीला आज सकाळी आग लागली. घटनेची माहिती मिळताच भोसरी उपविभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

आगीच्या ठिकाणी येण्यासाठी अडथळा आल्याने अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी येऊ शकला नाही. सोसायटीच्या गेट मधून गाडी आत येऊ शकली नाही. सोसायटीचे फायर ऑडिट करण्याची मागणी चेअरमन संचालक अजित गरुड यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.