Pune : मेट्रो ऑफिसमध्ये इलेक्ट्रीक मोटारीची चोरी

सुरक्षाकर्मचाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळील पुणे मेट्रोच्या ऑफिसमधील सुरक्षारक्षकाला मारहाण करत दोन तरुणांनी लेबर रुममध्ये ठेवलेल्या तीन हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रीक मोटारीची चोरी केली.

पटेल, (वय 19 , राहणार शिवाजीनगर) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. मोटारसायकलीवरुन  दोन अनोळखी तरुण पुणे मेट्रोच्या ऑफिसमध्ये आले. त्यांनी धक्का-बुक्की, शिवीगाळ करत मारहाण करुन इलेक्ट्रीक मोटार लंपास केल्याचे सुरक्षारक्षकाने सांगितले आहे. पटेल यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार नोंदविली आहे.

पोलीस उपनिरिक्षक एस.एम चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.