Pune News : मनसे वीज बिलासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत

एमपीसी न्यूज : ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलात सवलत देण्यास नकार दिल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. चहुबाजूने नितीन राऊत यांच्यावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या प्रकरणात आता उडी घेतली असून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी “लातो के भूत बातों से नही मानते” असे म्हणत आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

 

लॉकडाऊन लागू झाल्यापासून नागरिकांना भरमसाठ वीज बिल दिले जात आहे. एप्रिल महिन्यापासून हा वीज बिलांचा घोळ सुरू आहे. लॉकडाऊन काळामध्ये अनेकांना वीज बिल भरता आलेले नाही. काहींनी ऑनलाइन बिल भरले. मात्र, त्यांनादेखील दुप्पट-तिप्पट बिल महावितरणकडून पाठवण्यात आले आहे. एकंदरीतच सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन काळात भरमसाठ बिल आल्याने सर्वसामान्यांचे डोळे चक्रावले आहे. या वीज बिलामध्ये कुठेतरी सवलत मिळेल अशी आशा असताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मात्र कुठलीही सवलत देण्यास नकार दिला त्यामुळेे मनसे आक्रमक झाली आहे.

 

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण”लाथो के भूत बातों से नही मानते”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.