Talegaon Dabhade News : वीज पडून जीवित व वित्तहानीच्या घटना रोखण्यासाठी मावळ तालुक्यात वीज कंट्रोलर

एमपीसी न्यूज – पावसाळ्यात वीज पडून जीवित व वित्तहानीच्या घटना होतात. त्या घटना रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून मावळ तालुक्यात सर्वप्रथम माळवाडी ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (दि.4) वीज कंट्रोलर (वीज अटकाव) यंत्र बसवण्यात आले. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.

याप्रसंगी सरपंच पूनम आल्हाट, उपसरपंच सुनिल (नाना) भोंगाडे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी मराठे, पल्लवी दाभाडे, रेश्मा दाभाडे, ग्रामविकास अधिकारी के. पी. खेसे, संदीप दाभाडे, रोहिदास मराठे, विनोद आल्हाट, मयूर दाभाडेसह ग्रामस्थ  उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.