National Voters’ Day : मतदार ओळखपत्र झाले डिजिटल, मोबाइल, कम्प्यूटरवर डाऊनलोड करता येणार

एमपीसी न्यूज : मतदार ओळखपत्र आता डिजिटल झाले आहे. ते तुम्ही आपल्या मोबाइल, कम्प्यूटरवर डाऊनलोड करु शकणार आहात. निवडणूक आयोग आज म्हणजेच 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ई-मतदार ओळखपत्र लाँच करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे ई-ईपीआयसी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील आणि पाच नवीन मतदारांना ई-ईपीआयसी आणि मतदार ओळखपत्र प्रदान करतील.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, निवडणूक आयोगाची स्थापना  जानेवारी 1950 रोजी करण्यात आली होती. याचे औचित्य साधून निवडणूक आयोगाकडून 2011 या वर्षापासून दरवर्षी 25 जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात येतो.

e-EPIC म्हणजे काय?
e-EPIC एक इडिट न करता येण्यासारखा सुरक्षित पोर्टेबल दस्तऐवज स्वरूप (पीडीएफ) आवृत्ती आहे. यात सिक्युरिटी क्यूआर कोड असेल. ज्यात फोटो आणि अनुक्रमांक, भाग क्रमांक इ. असेल. तुम्ही मोबाइल किंवा संगणकावर वर ई-ईपीआयसी कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच, हे कार्ड संगणक आणि डिजिटल संग्रहित केले जाऊ शकते. या सुविधेद्वारे मतदार कोठूनही ऑनलाइन मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकतील.

ई-मतदार ओळखपत्र असे करता येणार
– सर्व प्रथम https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/account/login या संकेतस्थळाला भेट द्या.
यानंतर तुम्हाला लॉग-इन करावे लागेल. जर तुमचे अकाऊंट नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरू करु शकता.
– वेबसाईटवर लॉग-इन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा.
– 25 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11.14 नंतर तुम्ही वोटर आयडी डाऊनलोड करु शकणार आहात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.