_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon : सुपर मार्केट फोडून 20 हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास

Electronic goods worth Rs.20,000 stolen by break-in the supermarket.

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी सुपर मार्केट फोडून दुकानातून लॅपट़ॉप, प्रिंटर आणि अन्य 20 हजारांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी मावळ तालुक्यातील सांगवडे गावातील हिमांशू सुपर मार्केट येथ उघडकीस आली.

विशाल बाळासाहेब मोकाशी (वय 28, रा. सांगवडे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोकाशी यांचे सांगवडे गावात हिमांशू सुपर मार्केट नावाचे किराणा दुकान आहे.

मंगळवारी (दि. 28) रात्री साडेनऊ वाजता दुकान कुलूप लाऊन बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातून लॅपट़ॉप, प्रिंटर, होम ठीएटर, मोबईल, हार्ड डिस्क असा एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार बुधवारी (दि. 29) सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.